IND vs AUS 1st Test : सर्वांना उत्सुकता असणाऱ्या अशा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला सुरूवात झाली आहे. पर्थमध्ये पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार जसप्रीत बुमराह याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियामध्ये मोठे बदल झालेले दिसून आले आहेत. रविचंद्रन आश्विन आणि रविंद्र जडेजा यांना प्लेइंग इलेव्हनमधून डच्चू देण्यात आला आहे. तर हर्षित राणा आणि नितीश कुमार रेड्डी या दोघांचा डेब्यू होणार आहे. त्याचबरोबर सरफराज खान याला सुद्धा संघात स्थान मिळालं नसून जखमी शुभमन गिलच्या जागी देवदत्त पेडिक्कल याला संधी देण्यात आली आहे.
पहा प्लेइंग इलेव्हन..
भारत (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत (WK), ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह (C), मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (WK), पॅट कमिन्स (C), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवुड.