देशासह महाराष्ट्रात व्यसनाधीन लोकांची संख्या चांगलीच असल्याचे दिसून आले आहे. त्यात काही लोकं दररोज दारू पितात. पण, तुमचं हे करणं आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकतं. जे लोक आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा अल्कोहोलचे सेवन करतात त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी असतो. संशोधकांना संशोधनादरम्यान असे आढळून आले आहे की, आठवड्यातून तीन ते पाच पेये घेणे तुमच्या हृदयासाठी चांगले असू शकते.
अल्कोहोल निरोगी कोलेस्ट्रॉल निर्मिती करते. पण एकीकडे दारूमुळेही उच्च रक्तदाब होतो. त्यामुळे अनेकदा मद्यपान करण्यापेक्षा कमी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तसेच जे लोक दर आठवड्याला तीन ते पाच पेग पितात त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी प्रमाणात मद्यपान न करणाऱ्यांच्या तुलनेत 33 टक्के कमी असतो.
व्हिस्कीमध्ये इलॅजिक ऍसिड असते, एक रसायन जे संज्ञानात्मक कार्य सुधारते आणि अल्झायमरसारख्या रोगांपासून संरक्षण करते. असे जरी असले तरी आपल्याला ते कमी प्रमाणात सेवन करावे लागणार आहे. अल्कोहोलचे हृदय संरक्षणात्मक फायदे आहेत. नियमितपणे मध्यम प्रमाणात व्हिस्की प्यायल्याने हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक होण्याची शक्यता 50 टक्क्यांपर्यंत कमी होतो, असेही समोर आले आहे.