लहू चव्हाण
पाचगणी : जिल्हा क्रीडा कार्यालय, सातारा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाबळेश्वर तालुका स्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत पाचगणीतील सेंट झेविअर्स हायस्कूलने अजिंक्यपद पटकावले.
पाचगणी (ता. महाबळेश्वर) येथील एस. एम. बाथा हायस्कूलच्या क्रीडांगणावर या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत १७ वर्षाखालील संघामध्ये सेंट झेविअर्स हायस्कूल व एस. एम. बाथा हायस्कूल यांच्यामधे अंतिम सामना झाला. या चुरसीच्या सामन्यात सेंट झेविअर्स हायस्कूल ने २-१ ने जिंकून अंतिम लढत जिंकून जिल्हा स्तरावर जाण्यासाठी भरारी घेतली.
तसेच दुसरीकडे १७ वर्षाखालील मुलीनी तालुका स्तरावर द्वितीय स्थान पटकावले आहे. याबद्दल विजेत्या खेळाडूंचे संस्थेचे संचालक फादर टाॅमी, मुख्याध्यापक शहाजी मॅथ्यू व शिक्षक यांनी अभिनंदन केले.