पुणे : पत्नीने खिश्चन धर्म स्वीकारावा म्हणून शाररीक व मानसिक छळ करून बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील येरवडा परिसरात घडला आहे. याप्रकरणी एकाच्या विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविंदरसिंह भंवरसिंह राजपुरोहित (वय ४३, रा. त्रिदलनगर सोसायटी, येरवडा) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका ४३ वर्षाच्या महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदर प्रकार हा २००१ पासून सुरु आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी रविंदरसिंह राजपुरोहित यांचा विवाह झाला आहे. त्यानंतर आरोपी राजपुरोहित याने २००१ मध्ये खिश्चन धर्म स्वीकारला. तेव्हापासून आरोपीने पत्नी व तिचे आईवडिल व मुलांनी खिश्चन धर्म स्वीकारावा, यासाठी फिर्यादीचा शारीरीक व मानसिक त्रास देऊ लागला.
त्यानंतर आरोपी राजपुरोहित याने फिर्यादी यांना हाताने मारहाण केली. आरोपीने मुलाला खिश्चन धर्माच्या शाळेत टाकेल अशी धमकी फिर्यादी यांना देत होता. तसेच आरोपीने घरातील देवाच्या मूर्ती व फोटो नदीत टाकून फिर्यादी यांच्या धार्मिक भावना दुखावल्या.
दरम्यान, याप्रकरणी फिर्यादी यांनी आरोपी राजपुरोहित याच्याविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.