पुणे : सोलापूर शहरातील एका २५ वर्षीय तरुणीने तलावात आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी ( ता.२९) रोजी घडली होती. याप्रकरणी पुण्यातील एका तरुणाविरोधात सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वप्नील बंडे (रा. पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मृत तरुणीच्या आईने सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, मृत तरुणी ही पुणे येथे नोकरी करीत होती. त्यावेळी तरुणीची एका तरुणासोबत मैत्री झाली. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले. तरुणी ही पाच महिन्यांची गरोदर होती. तरुणी पाच महिन्याची गरोदर असताना तरुणाने लग्नास नकार दिल्याने तरुणीने तलावात उडी मारून आत्महत्या केली.
दरम्यान, या घटनेचा तपास सुरू असताना आत्महत्या करणाऱ्या तरुणीची ओळख पटली. तेव्हा मृत तरुणीच्या आईने सदर बझार पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
त्यानुसार संशयित आरोपी स्वप्नील बंडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.