आपल्या आरोग्याकडे लक्ष देणारे अनेकजण असतात. त्यात तुम्ही जास्त प्रमाणात कॅल्शियम सप्लिमेंट्स घेत असाल तर ते आत्ताच थांबवा. कारण, अशाने तुमच्या हृदयावर गंभीर परिणाम होऊ शकतो. अतिरिक्त कॅल्शियम सप्लिमेंट्सच्या स्वरूपात घेतल्याने हृदयाच्या नसांमध्ये ब्लॉकेज होण्याचा धोका वाढतो आणि हृदयाचे आजार अधिक गंभीर होऊ शकतात.
कॅल्शियम सप्लिमेंट्सवर अवलंबून न राहता नैसर्गिक अन्न स्रोतातून शरीराची दैनंदिन कॅल्शियमची गरज भागवणे अधिक सुरक्षित आणि आरोग्यदायी मानले जाते, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. कॅल्शियम हे एक आवश्यक पोषण आहे जे आपल्या शरीरातील हाडांची वाढ आणि हृदयाची लय नियंत्रित करून हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते आणि स्नायूंचे आरोग्यदेखील वाढवते आणि शरीर मजबूत करते.
जर तुम्ही जास्त प्रमाणात कॅल्शियम सप्लिमेंट्स खात असाल तर ते तुमच्या रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवू शकते आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. हे तुमच्या नसा कडक करते, ज्यामुळे हृदयाचे आजार होऊ शकतात. याशिवाय मज्जातंतूंचा अडथळा आणि हृदयविकाराचा झटका याही गंभीर समस्या उद्भवू शकतात.
कॅल्शियम प्लेकचा वाढवू शकतो धोका..
कोलेस्टेरॉल, चरबी आणि इतर गोष्टींमुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक जमा होतो. नसांमध्ये प्लेक जमा झाल्यामुळे शरीराला अनेक समस्या निर्माण होतात. मेंदूच्या नसांमध्ये प्लेक जमा झाल्यामुळे मेंदूपर्यंत रक्त पोहोचत नाही, अशाने स्ट्रोकचा धोका वाढतो. त्यामुळे याकडेही लक्ष द्यावे.