नवी दिल्ली : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) विभागात अनेक रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. हेड-टेक्निकल आणि हेड-टोल ऑपरेशनच्या पदांसाठी ही अर्ज प्रक्रिया सुरु आहे. या नोकरीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार NHAI च्या nhai.gov.in या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेऊ शकतात.
या पदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी सरकारी वाहनासह 29,00,000 रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळणार आहे. त्यासाठी उमेदवारांना विहित पात्रता निकष आणि अनुभवानुसार काळजीपूर्वक अर्ज भरण्याचा सल्ला दिला जात आहे. प्रोफाईल/अनुभव इत्यादींबाबत माहिती घेऊनच अर्ज करावा. सर्व पात्रता भारतीय विद्यापीठे किंवा UGC द्वारे मान्यताप्राप्त संस्थांकडून प्राप्त करणे आवश्यक आहे.
प्रारंभिक नियुक्ती दोन (2) वर्षांच्या कालावधीसाठी असेल, जी NHIPMPL च्या गरजा आणि उमेदवाराच्या कामगिरीवर अवलंबून वाढविली जाऊ शकते. उमेदवाराकडे पूर्ण वेळ, मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंगमधील नियमित BE/B.Tech पदवी असावी. यामध्ये उमेदवारांचे वय 55 वर्षांपेक्षा जास्त नसावे. सेवानिवृत्त सरकारी अधिकाऱ्यांसाठी अर्ज करण्याचे कमाल वय 63 वर्षे असणार आहे.