नवी दिल्ली : सध्या अनेक टेक अॅप लाँच केले जात आहेत. त्यात OpenAI कंपनीने एक मोठं अपडेट म्हणजेच ChatGPT Search लाँच केलंय. हे स्वतंत्रपणे लाँच करण्याऐवजी कंपनीने यात फीचर म्हणून जोडले आहे. अशा परिस्थितीत, युजर्संना आता चांगले आणि अचूक रिझल्ट मिळू शकणार आहेत. हे Google Search पेक्षा वेगळ्या पद्धतीने काम करणार आहे.
ChatGPT च्या या फीचरची खूप दिवसांपासून मागणी होत होती आणि आता हे फीचर आले आहे. सध्या हे वैशिष्ट्य ChatGPT Plus आणि टीम युजर्ससाठी उपलब्ध आहे. OpenAI च्या वेबसाईटवर लॉग इन केल्यास तेथे ChatGPT Search चा पर्याय होता, त्यावर क्लिक केल्यानंतर Chrome Extension install करण्याचा पर्याय देखील दिसेल.
अशाप्रकारे ChatGPT च्या माध्यमातून करता येईल Search…
Chatgpt.com वर लॉग इन केल्यानंतर, युजर्संना Search बारमध्ये संलग्नक जवळ शोध चिन्ह दिसेल. जर युजर्संना इंटरनेटवर कोणतीही माहिती शोधायची असेल, तर ते शोध चिन्हावर क्लिक करून तपशील शोधू शकतात.
ChatGPT चे हे मॉडेल युजर्संना हवामान अंदाज आणि स्टॉकच्या किमतीपासून ते खेळापर्यंतची माहिती देईल. चॅटबॉटच्या होम पेजवर डायरेक्ट टॅबही उपलब्ध असतील. ओपनएआयने आपल्या ब्लॉगपोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘चॅटजीपीटी आता पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे वेबवर शोधू शकते.’