उरुळी कांचन, (पुणे) : निवडणुकीत समोरच्याला पराभूत करण्यासाठी समोरच्या उमेदवारांकडून अनेक क्लृप्त्या वापरल्या जातात. नावात साधर्म्य असलेले उमेदवार, निवडणूक चिन्हातील साधर्म्य यासह विविध फंडे निवडणुकीत डोकेदुखी वाढवून जातात.
शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात दोन अशोक पवार मैदानात आहेत. यातील उरुळी कांचन (ता. हवेली) येथील अशोक रामचंद्र पवार हे अपक्ष निवडणूक लढवणार असून यांना अंगठी हे चिन्ह मिळाले आहे. चिंचणी येथील अशोक गणपत पवार यांना रोडरोलर हे चिन्ह मिळाले आहे. सारख्या नावाचे उमेदवार मैदानात असल्याने सेम नेमची शक्कल कोणाची? सेम नेमचा फॉर्म्युला कोणाचा गेम करणार? या बद्दल उत्सुकता लागली आहे.
शिरूर – हवेली मतदार संघात विद्यमान आमदार अशोक पवार यांच्या नावाचे दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता. तसेच दोघांनीही अर्ज कायम ठेवला आहे. दरम्यान, सोमवारी माघार आणि निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप केले आहे. यामध्ये नावात साधर्म्य असलेले दोन उमेदवार मैदानात उतरले आहेत. टेबल, कॉट, ट्रॅक्टर व बुलडोझर या चिन्हांमुळे मतदारांमध्ये गोंधळ होत असल्याचे यापूर्वीच्या निवडणुकीत सिद्ध झालेले आहे. नाव साधर्म्याच्या गेमनंतर आता चिन्हांमध्येही अशीच गेम होणार का? या बद्दल मोठी उत्सुकता लागली आहे.