नवी दिल्ली : नवरा बायकोच्या भांडण इतकं विकोपालागेल की पत्नीने केलेल्या भयावह कृत्याचा पोलिसांना सुद्धा धक्का बसला आहे. पत्नीने पतीचा प्रायव्हेट पार्ट कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिस लगेचच घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जखमी पतीला रुग्णालयात दाखल केलं. पीडित पुरुष आणि आरोपी महिलेचं हे तिसरं लग्न असून हे दोघंही काहीच दिवसांपूर्वी बिहारवरून दिल्लीला आले होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, उत्तर दिल्लीमध्ये हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित पुरुषाला दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसंच त्याची प्रकृती गंभीर नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. पोलिसांनी पीडित पुरुषाचा जबाब नोंदवला आहे, पण तो जेव्हा संपूर्ण माहिती द्यायच्या मनस्थितीमध्ये येईल तेव्हा पुढची चौकशी केली जाणार आहे. दरम्यान आरोपी महिला फरार असून तिचा शोध घेतला जात आहे.
काही दिवसांपूर्वीच पती-पत्नी बिहारवरून दिल्लीला आले होते. या दोघांचंही हे तिसरं लग्न होतं. पीडित पुरुष शक्ती नगर भागातल्या एका गेस्ट हाऊसमध्ये काम करतो. दिवाळीच्या रात्री 31 ऑक्टोबरला मध्यरात्री पती दारू पिऊन घरी पोहोचला, तेव्हा त्याचं आणि पत्नीचं जोरदार भांडण झालं, यानंतर पत्नी घरातून निघून गेली. यानंतर पती बेडवर जाऊन झोपला असताना पत्नी पुन्हा घरी आली आणि तिने धारदार शस्त्राने पतीचा प्रायव्हेट पार्ट कापला. यानंतर पीडित पतीला बाडा हिंदू राव हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, पण त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी सफदरजंग हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं आहे.