पुणे : सरकारी नोकरी मिळावी यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण, अजूनही तुम्ही नोकरीच्या शोधात असाल आणि तुमच्याकडे MBBS अथवा BDS ची पदवी असेल तर मग कामच झालं. तुम्हाला एका सरकारी विभागात नोकरीची संधी मिळण्याची खूपच शक्यता आहे. कारण, अशाच पात्र उमेदवारांसाठी ही भरती केली जात आहे.
वर्धा येथील माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना येथे ही भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी ऑफलाईन माध्यमातून अर्ज करावा लागणार आहे. वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी आणि नर्सिंग सहाय्यक यांसारख्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला वर्धा येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 3 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
सदर मुलाखत ही 20 आणि 21 नोव्हेंबर 2024 रोजी स्टेशन मुख्यालय, पुलगाव येथे घेतली जाणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.echs.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी आणि नर्सिंग सहाय्यक.
– एकूण रिक्त पदे : 03 पदे.
– नोकरीचे ठिकाण : वर्धा, अकोला, अमरावती.
– शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस, बीडीएस, बी.एस्सी.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 18,100/- ते रु. 75,000/- पर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 नोव्हेंबर 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : OIC, Stn HQ (ईसीएचएस सेल), सीएडी पुलगाव, तेह – देवळी, जिल्हा – वर्धा, पिन-442303.