फिरायला जाणारे अनेक इच्छुक पाहिला मिळतात. विकेंड आला तर त्यांचा प्लॅनही अनेकदा ठरलेला असतो. त्यात तुम्ही फॉरेन अर्थात परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर इंडोनेशिया हा सध्या चांगला पर्याय आहे. कारण, इथं पर्यटनाला चालना देण्यासाठी इंडोनेशियाने 96 देशांसाठी ‘व्हिसामुक्त’ प्रवासाची घोषणा केली आहे.
वास्तविक, इंडोनेशिया हा मुस्लिमबहुल असा देश आहे. हा देश 17,000 बेटांनी बनलेला असून, अतिशय सुंदर आहे, ज्याचे समुद्रकिनारे पर्यटकांना आकर्षित करतात. पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी, इंडोनेशियाने नवीन व्हिसा धोरण लागू केले आहे. ज्यामध्ये 96 देशांतील पर्यटकांना इंडोनेशियाला भेट देण्यासाठी कोणत्याही व्हिसाची आवश्यकता भासणार नाही.
व्हिसामुक्त या 96 देशांमध्ये अमेरिका, सिंगापूर, युनायटेड किंगडम, जपान, मेक्सिको, संयुक्त अरब अमिरातीचा समावेश आहे. या देशांतील नागरिकांना इंडोनेशियाला भेट देण्यासाठी व्हिसाची गरज भासणार नाही. यामुळे इंडोनेशियाकडे अधिकाधिक पर्यटक आकर्षित होतील, ज्यामुळे देशाची अर्थव्यवस्था देखील मजबूत होईल, असा या देशाचा उद्देश आहे.
सध्या जागतिक पर्यटनस्थळ म्हणून इंडोनेशियाची लोकप्रियता सतत वाढत आहे. इंडोनेशियामध्ये येणाऱ्या पर्यटकांची सर्वाधिक संख्या शेजारील देशांमधून आहे, ज्यात मलेशिया (17.47%), ऑस्ट्रेलिया (11.98%) आणि सिंगापूर (9.69%) यांचा समावेश आहे. पर्यटकांची ही वाढती संख्या खरोखरच उल्लेखनीय असल्याचे म्हटले जात आहे.