पुणे : जबरी चोरीसह विविध गुन्हे दाखल असलेल्या तडीपार आरोपीला गुन्हे शाखा युनिट ६ ने आज केसनंद येथून अटक केली आहे. गणेश रामदास काळे (वय 34 वर्षे रा. वाघेश्वर नगर, गायरान वस्ती, वाघोली, पुणे) असे सराईत आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, गुन्हे शाखा युनिट 6 हद्दीमध्ये पोलीस उप-निरीक्षक दळवी, ऋषीकेश व्यवहारे, रमेश मेमाणे, नितीन धाडगे, सुहास तांबेकर असे गुन्हे प्रतिबंधक गस्त करत असताना ऋषीकेश व्यवहारे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, रेकॉर्ड वरील तडीपार गुन्हेगार गणेश काळे हा महादेव मंदिर शेजारी, शिवशंभो नगर, लाडबा वस्ती, केसनंद येथे थांबलेला आहे. अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने त्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने आरोपी गणेश रामदास काळे याला ताब्यात घेण्यात आले.
गणेश काळे हा आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर लोणीकंद पोलीस ठाणे येथे जबरी चोरी(सह मोक्का), गंभीर दुखापत, म. पो. का १४२ कारवाई यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्यास ऑक्टोबर 2022 पासुन 2 वर्षासाठी पुणे शहर आयुक्तालय, पुणे व पिंपरी चिंचवड आयुक्तालय जिल्हयाच्या हद्दीतुन तडीपार केले होते. आज त्याला अटक करण्यात अली असून त्याच्याविरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142 अन्वये वाघोली पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करून पुढील तपास करण्यासाठी वाघोली पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे)निखिल पिंगळे, सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र मुळीक गुन्हे शाखा, युनिट -6 चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उप-निरीक्षक रामकृष्ण दळवी, रमेश मेमाणे, ऋषीकेश व्यवहारे, नितीन धाडगे, सुहास तांबेकर, बाळासाहेब तनपूरे, गणेश डोंगरे, किर्ती नरवडे, प्रतीक्षा पानसरे यांनी केली आहे.