पुणे : सरकारी नोकरीच्या शोधात तुम्ही असाल तर आम्ही तुम्हाला एका चांगल्या नोकरीची माहिती देणार आहोत. पुण्यातील माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना (ECHS) येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे.
माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना (ECHS), पुणे येथे वैद्यकीय विशेषज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी यांसारख्या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 2 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
सदर मुलाखत ही 6 नोव्हेंबर रोजी ईसीएचएस पॉलिक्लिनिक, लोहगाव, पुणे येथे घेतली जाणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://echs.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : वैद्यकीय विशेषज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी.
– एकूण रिक्त पदे : 02 पदे.
– नोकरीचे ठिकाण : पुणे.
– शैक्षणिक पात्रता : एमडी / एमएस स्पेशॅलिटी संबंधित / डीएनबी, एमबीबीएस.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 75,000/- ते रु. 1,00,000/- पर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 नोव्हेंबर 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : OIC Stn मुख्यालय (ECHS सेल), दक्षिण पुणे, लोहेगाव.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 06 नोव्हेंबर 2024.
– मुलाखतीचा पत्ता : ईसीएचएस पॉलिक्लिनिक लोहेगाव, पुणे.