Wednesday, June 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वडगाव शेरीमधून उमेदवारी जाहीर होताच सुनील टिंगरेंची पहिली प्रतिक्रिया समोर; म्हणाले, ‘जगदीश मुळीक जेष्ठ..’

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 25 October 2024, 13:21

पुणे : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दुसरी यादी जाहीर करण्यात आली असून त्यामध्ये पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघाचा उमेदवार जाहीर झाला आहे. आज सकाळी (शुक्रवारी) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे वडगाव शेरीचे विद्यमान आमदार यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वडगाव शेरी मतदारसंघातून भाजपचे नेते आणि माजी आमदार जगदीश मुळीक हे देखील आग्रही होते, तर मुळीक यांना भाजप श्रेष्ठींनी शब्द दिल्याचं देखील त्यांनी सांगितलं होतं, त्यानंतर आज सकाळी सुनील टिंगरे यांच्या नावाची घोषणा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुनील टिंगरे यांनी पुण्यातील दगडूशेठ हलवाई मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘महायुतीमधील सर्व नेते, माझ्या पक्षाचे नेते या सर्वांचे मी आभार मानतो. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती, त्यामुळे शंका नव्हती पण सगळ्यांना जागा हवी असते. आता उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे महायुतीतील सर्वजण प्रचार करतील, आदेश आला की सर्वजण काम करतील. कल्याणी नगर अपघात प्रकरण सर्व क्लिअर झाले आहे. सगळे नेते प्रचाराला येतील. 28 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार आहे. जगदीश मुळीक यांच्यासह सर्वांची भेट घेणार आहे. ते जेष्ठ नेते आहेत,’ असंही यावेळी सुनील टिंगरे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.

 

उमेदवारीसाठी सुरू होती रस्सीखेच..

पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून आजी-माजी आमदार इच्छुक असल्याचे चित्र होते. अजित पवारांच्या पक्षाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना वगळून आपल्याला उमेदवारी मिळेल, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्याला तसे आश्वासन दिल्याचा दावा भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांच्याकडून करण्यात आला होता.

तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना आधीच एबी फॉर्म दिला होता. मात्र, पक्षाकडून त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली नव्हती. राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत सुनील टिंगरेंचे नाव सुद्धा नव्हते. दुसरीकडे या मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळेल असा दावा भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी व्यक्त केला. त्यामुळे या मतदारसंघात तिढा निर्माण झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. आज सकाळीच सुनील टिंगरेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आता जगदीश मुळीक कोणती भूमिका घेतात, किंवा त्यांना दुसरीकडे कुठे उमेदवारी देण्यात येते का? हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

दुसऱ्या यादीत कोणाला उमेदवारी?

  1. अणुशक्तीनगर : सना मलिक
  2. तासगाव कवठे-महाकाळ : संजय काका पाटील
  3. इस्लामपूर : निशिकांत पाटील
  4. लोहा कंधार : प्रतापराव चिखलीकर
  5. वांद्रे पूर्व : झिशान सिद्धकी
  6. शिरुर : ज्ञानेश्वर कटके
  7. वडगाव शेरी : सुनिल टिंगरे

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

इराण-अमेरिका युद्ध पुन्हा भडकले! अमेरिकेने इराणच्या 20 ठिकाणांवर केला हल्ला

Wednesday, 10 June 2026, 10:42

आंबवणे येथे बेपत्ता महिलेचा नदीपात्रात मृतदेह आढळला; परिसरात शोककळा

Wednesday, 10 June 2026, 9:47

Maharashtra weather: महाराष्ट्रात मान्सूनची संमिश्र स्थिती; 16 जिल्ह्यांना यलो अलर्ट, तर मुंबई-पुणेकरांना अद्याप प्रतीक्षा

Wednesday, 10 June 2026, 9:42

Daily horoscope: आजचा दिवस कोणासाठी ठरणार लकी? वाचा 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Wednesday, 10 June 2026, 9:37

नवले पुलाचा ‘मृत्यूचा सापळा’ कायम; मिक्सरखाली चिरडून तरुणाचा जागीच अंत

Wednesday, 10 June 2026, 9:26

ऊर्जा युद्धावर भारताचा मास्टरस्ट्रोक! 40 हजार कोटींची गॅस पाइपलाइन; थेट ओमानमधून मिळणार गॅस

Tuesday, 9 June 2026, 22:59
Next Post
Yogesh sasane and mhadev babar likely to file nomination as independent hadapasar pune

माजी महापौर प्रशांत जगताप यांना उमेदवारी जाहीर होताच हडपसरमध्ये फडकलं बंडाचं निशाण; महाविकास आघाडीमधील योगेश ससाणे, महादेव बाबर बंडखोरीच्या तयारीत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.