राहुलकुमार अवचट / यवत : सर्वांचे लक्ष लागलेलया पुणे जिल्ह्यातील १९९ दौंड विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून डॉ. ए. वेंकडेश बाबू (IRS) यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती दौंड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी मिनाज मुल्ला यांनी दिली आहे.
डॉ. ए. वेंकडेश बाबू यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह, पुणे येथील कक्ष क्रमांक ए-१०६ असा असून संपर्क क्रमांक ९२२६१८४५५४ असा आहे. निवडणूक खर्च निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी हरिष बोरावके हे असून त्यांचा संपर्क क्रमांक ९७०२४१३०१८ असा आहे. डॉ. ए. वेंकडेश बाबू हे सकाळी १० ते ११ या वेळेत व्हीव्हीआयपी विश्रामगृह, पुणे या ठिकाणी भेटतील, असे दौंड विधानसभा मतदार संघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून कळविण्यात आले आहे.
१९९ दौंड विधानसभा निवडणूक २२ ऑक्टोबरला २० उमेदवारांसाठी ४० तर आज २३ ऑक्टोबरला १३ उमेदवारांसाठी २६ असे एकूण ६६ अर्ज विक्री झाली असल्याचे माहिती तहसीलदार अरुण शेलार यांनी दिली आहे.