बीड : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच आता वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला आहे. मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीने बैठक बोलावली होती. या बैठकीत मराठा आरक्षण विरोधी भूमिका घेतल्याने अशोक हिंगे नाराज होते. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगितलं आहे.
अशोक हिंगे यांनी बीड लोकसभेसाठी निवडणूक सुद्धा लढवली होती. मात्र कार्यकारणीच्या मागणीमुळे सामाजिक दृष्ट्या पक्षात काम करणे अडचणीचे ठरत असल्याचे सांगत अशोक हिंगे यांनी पक्षश्रेष्ठीकडे मराठवाडा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजलाय अशातच वंचित बहुजन आघाडीने बीड जिल्ह्यात गेवराई, आष्टी आणि माजलगाव विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवार देखील जाहीर केले आहे.