नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यात प्रसिद्ध कंपनी Xiaomi ने आपला बजेट फोन नुकताच लाँच केला आहे. Xiaomi ने Redmi 13 5G हा स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन चांगल्या प्रीमियम लूकमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये बॅक पॅनलवर क्रिस्टल डिझाइनचा वापर करण्यात आला आहे. हा फोन ब्लू, ब्लॅक डायमंड आणि ऑर्किड पिंक या तीन कलर व्हेरियंटमध्ये मिळतो.
Xiaomi च्या या स्मार्टफोनचे वजन 205 ग्रॅम असून, यात खालच्या बाजूला पोर्ट आहेत, ज्यामध्ये स्पीकर्स ग्रिल आणि टाइप सी पोर्टही आहेत. तर वरच्या बाजूला IR Blaster आणि 3.5mm हेडफोन जॅक आहे. व्हॉल्यूम बटण आणि पॉवर बटण उजव्या बाजूला तुम्हाला दिसून येणार आहे. साईड फिंगरप्रिंट स्कॅनर फक्त पॉवर बटणावर दिसेल. या हँडसेटमध्ये डाव्या बाजूला सिम ट्रेही देण्यात आला आहे.
Redmi 13 5G मध्ये 6.79-इंचाचा LCD डिस्प्ले देण्यात आला असून, ज्यामध्ये 2,400×1,080 (FHD+) रिझोल्यूशन आहे. याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. Redmi 13 5G मध्ये 108MP प्रायमरी कॅमेरा असून, जो Samsung ISOCELL HM6 प्रायमरी कॅमेरा सेन्सर आहे. सेन्सर f/1.75 अपर्चर आकाराचा आहे आणि तो सेन्सर झूममध्ये 3X सह येतो. यात 2MP डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे.