पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वेगवान हालचालीमुळे बिहार येथे दुर्घटनेत जखमी झालेल्या सातारा जिल्ह्यातील गुरसाळे येथील चार जणांच्या मराठी कुटुंबाला उपचारासाठीची मोठी मदत मिळाली आहे. अमोल जाधव हे मदत मिळालेल्या मराठी मानसाचे नाव असुन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वेगवान हालचालीमुळे अमोल जाधव व त्याच्या कुटुबांस बिहारहुन विमानाने पुण्यात आणुन, पुण्यातील सुर्या हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात यश आले आहे. वरील चारही जणांची प्रकृती चांगली असुन,चारही जणांच्यावर सुर्या हॉस्पीटलमध्ये उपचार चालु आहे.
अमोल जाधव यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वेगवान हालचालीमुळे मदत मिळु शकली असली तरी, या मदतीमागे पुणे जिल्हातील थेऊर (ता. हवेली) येथील युवराज काकडे या पैलवानाचा विशेष हात असल्याचे पुढे आले आहे. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, शिवसेना वैद्यकीय मदत समन्वयक राजाभाऊ भिलारे व युवराज काकडे या तिघांनी शनिवारी रात्रभर व आज दिवसभर धावपळ करुन, अमोल जाधव व त्यांच्या कुटुबियांना मदत मिळवुन देण्याचे पवित्र काम केले आहे.
बिहार मधील पाटणा येथे, महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील गुरसाळे येथील, अमोल जाधव यांचे कुटुंब उदरनिर्वाहासाठी वास्तव्यास आहे. काल शनिवारी मध्यरात्री २ वाजता राहत्या घरात गॅसच्या गळतीने मोठा स्फोट होऊन, कुटुंबातील चारही लोकांना मोठ्याप्रमाणात भाजले. त्यांना तात्काळ पाटणा येथे खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.
परंतु तेथील डॉक्टरांनी रुग्णांना पुढील उपचारांसाठी पुणे किंवा मुंबई येथे जळालेल्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या स्पेशल दवाखान्यात हलविण्यास सांगितले. त्यानंतर या कुटुंबाच्या नातेवाईकांनी पुढील उपचारासाठी पुण्याला नेण्याचा निर्णय घेतला आणि Air Ambulance मिळणेसाठी प्रयत्न सुरू केले.
यावेळी Air Ambulance कंपनीने एका वेळी एकच रुग्ण नेता येईल असे सांगितले. त्यामुळे सदर कुटुंबाचे नातेवाईक हतबल झाले. हवाई वाहतुकीचा होणारा लाखोंचा खर्च कोठून करणार, हा गंभीर प्रश्न समोर ठेवून शनिवारी दिवसभर अश्रू ढाळत होते. या वेळी नातेवाईकांनी त्यांच्या भागातील अनेकांकडे मदतीचा हात मागितला पण यश येऊ शकले नाही. हवाई वाहतुकीचा अमाप खर्च असल्याने नातेवाईकांचा मानसिक ताण वाढत चालला होता.
त्यावेळी एका नातेवाईकाने सांगलीचे आमदार अनिल बाबर यांचे मार्फत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संपर्क केला. संपर्क झाल्यावर नातेवाईकांनी सर्व हकीकत मुख्यमंत्र्यांना सांगितली. त्यानंतर तात्काळ सूत्रे फिरण्यास सुरुवात झाली. खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी प्रथम आणि नंतर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना अतितात्काळ, शासकीय Air Ambulance मिळण्यासाठी विनंती केली, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे शासकीय Air Ambulance उपलब्ध होऊ शकली नाही.
दरम्यान वेळ अतिशय नाजूक असल्याने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी विनाविलंब स्वखर्चातून २, Air Ambulance बुक केल्या. आणि त्या कुटुंबाला, दिवस उजाडण्याचा आत पुण्यात आणण्याचे आदेश शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यास दिले. आणि विमान दिवस उजेडण्याच्या सुमारास पाहिले विमान दाखल झाले.
जखमीपैकी ११ वर्षाच्या मुलास घेऊन आज सकाळी ६ वाजता स्पेशल विमान (Air ambulance) पुण्यातील लोहगाव विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर जखमी पैकी दुसऱ्या १२ वर्षाच्या बालकास घेऊन दुसरे विशेष विमान (Air Ambulabce) सकाळी ११ वाजता विमानतळावर दाखल झाले. दोन्ही जखमी रुग्णांना, शिवसेना वैद्यकीय मदत समन्वयक राजाभाऊ भिलारे व युवराज काकडे यांच्या सहाय्याने पुण्यातील सूर्या सह्याद्री रुग्णालयात दाखल केले असून, येथे चांगल्याप्रकारे उपचार सुरू आहेत.