Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे जिल्हातील ‘थेऊर’ च्या पैलवानामुळे बिहारमधील मराठी कुटुबांला मुख्यमंत्री कक्षाकडुन मिळाली तातडीची मदत….

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 17 July 2022, 18:38

पुणे :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वेगवान हालचालीमुळे बिहार येथे दुर्घटनेत जखमी झालेल्या सातारा जिल्ह्यातील गुरसाळे येथील चार जणांच्या मराठी कुटुंबाला उपचारासाठीची मोठी मदत मिळाली आहे. अमोल जाधव हे मदत मिळालेल्या मराठी मानसाचे नाव असुन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वेगवान हालचालीमुळे अमोल जाधव व त्याच्या कुटुबांस बिहारहुन विमानाने पुण्यात आणुन, पुण्यातील सुर्या हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात यश आले आहे. वरील चारही जणांची प्रकृती चांगली असुन,चारही जणांच्यावर सुर्या हॉस्पीटलमध्ये उपचार चालु आहे.

 

अमोल जाधव यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वेगवान हालचालीमुळे मदत मिळु शकली असली तरी, या मदतीमागे पुणे जिल्हातील थेऊर (ता. हवेली) येथील युवराज काकडे या पैलवानाचा विशेष हात असल्याचे पुढे आले आहे. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, शिवसेना वैद्यकीय मदत समन्वयक राजाभाऊ भिलारे व युवराज काकडे या तिघांनी शनिवारी रात्रभर व आज दिवसभर धावपळ करुन, अमोल जाधव व त्यांच्या कुटुबियांना मदत मिळवुन देण्याचे पवित्र काम केले आहे.

बिहार मधील पाटणा येथे, महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील गुरसाळे येथील, अमोल जाधव यांचे कुटुंब उदरनिर्वाहासाठी वास्तव्यास आहे. काल शनिवारी मध्यरात्री २ वाजता राहत्या घरात गॅसच्या गळतीने मोठा स्फोट होऊन, कुटुंबातील चारही लोकांना मोठ्याप्रमाणात भाजले. त्यांना तात्काळ पाटणा येथे खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.

परंतु तेथील डॉक्टरांनी रुग्णांना पुढील उपचारांसाठी पुणे किंवा मुंबई येथे जळालेल्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या स्पेशल दवाखान्यात हलविण्यास सांगितले. त्यानंतर या कुटुंबाच्या नातेवाईकांनी पुढील उपचारासाठी पुण्याला नेण्याचा निर्णय घेतला आणि Air Ambulance मिळणेसाठी प्रयत्न सुरू केले.

यावेळी Air Ambulance कंपनीने एका वेळी एकच रुग्ण नेता येईल असे सांगितले. त्यामुळे सदर कुटुंबाचे नातेवाईक हतबल झाले. हवाई वाहतुकीचा होणारा लाखोंचा खर्च कोठून करणार, हा गंभीर प्रश्न समोर ठेवून शनिवारी दिवसभर अश्रू ढाळत होते. या वेळी नातेवाईकांनी त्यांच्या भागातील अनेकांकडे मदतीचा हात मागितला पण यश येऊ शकले नाही. हवाई वाहतुकीचा अमाप खर्च असल्याने नातेवाईकांचा मानसिक ताण वाढत चालला होता.

त्यावेळी एका नातेवाईकाने सांगलीचे आमदार अनिल बाबर यांचे मार्फत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संपर्क केला. संपर्क झाल्यावर नातेवाईकांनी सर्व हकीकत मुख्यमंत्र्यांना सांगितली. त्यानंतर तात्काळ सूत्रे फिरण्यास सुरुवात झाली. खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी प्रथम आणि नंतर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना अतितात्काळ, शासकीय Air Ambulance मिळण्यासाठी विनंती केली, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे शासकीय Air Ambulance उपलब्ध होऊ शकली नाही.

दरम्यान वेळ अतिशय नाजूक असल्याने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी विनाविलंब स्वखर्चातून २, Air Ambulance बुक केल्या. आणि त्या कुटुंबाला, दिवस उजाडण्याचा आत पुण्यात आणण्याचे आदेश शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यास दिले. आणि विमान दिवस उजेडण्याच्या सुमारास पाहिले विमान दाखल झाले.

जखमीपैकी ११ वर्षाच्या मुलास घेऊन आज सकाळी ६ वाजता स्पेशल विमान (Air ambulance) पुण्यातील लोहगाव विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर जखमी पैकी दुसऱ्या १२ वर्षाच्या बालकास घेऊन दुसरे विशेष विमान (Air Ambulabce) सकाळी ११ वाजता विमानतळावर दाखल झाले. दोन्ही जखमी रुग्णांना, शिवसेना वैद्यकीय मदत समन्वयक राजाभाऊ भिलारे व युवराज काकडे यांच्या सहाय्याने पुण्यातील सूर्या सह्याद्री रुग्णालयात दाखल केले असून, येथे चांगल्याप्रकारे उपचार सुरू आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post

Big News : शिवसेना बंडखोरीबाबतच्या सर्व याचिकांवर सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत २० जुलै रोजी सुनावणी...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.