दीपक खिलारे
इंदापूर : काझड (ता.इंदापूर) येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे कोअर कमिटीचे अध्यक्ष राजवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत (दि.२६) भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.
काझड येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते दासा गंगाराम नरूटे-पाटील, हनुमंत नाना काळे, नामदेव दिनकर नरूटे, बाळासाहेब साहेबराव नरूटे व शंकर ज्ञानदेव वीर यांनी इंदापूर येथील भाग्यश्री निवासस्थानी राजवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी राजवर्धन पाटील यांनी या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करून त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या.
भारतीय जनता पक्षाचे विचार, कार्यपद्धती तसेच सर्वसामान्यांच्या हितासाठी पक्षाचे प्रयत्न लक्षात घेऊन तसेच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वावर असलेला विश्वास यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
यावेळी काझड येथील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नाथा नाना पाटील, तुषार ठोंबरे, माजी नगरसेवक शेखर पाटील उपस्थित होते.