-गणेश सुळ
केडगाव : देशातील निवडणुका ईव्हीएम मशीनद्वारे घेतल्या जातात. या ईव्हीएम मशीन संदर्भात संभ्रम निर्माण होतो. या पार्श्वभुमीवर निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीन जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. दौंड विधानसभा क्षेत्रात तहसील कार्यालय यांच्या मार्गदर्शनामध्ये ईव्हीएम जनजागृती मोहीम सुरू झाली आहे. 2024 हे निवडणुकांचे वर्ष म्हणून गणले जाणार आहे. यावर्षी लोकसभा विधानसभा निवडणुका संपूर्ण देशात पार पडणार आहे. या अनुषंगाने निवडणूक आयोगाने तयारी सुरु केली आहे. निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीन जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.
शनिवार ( ता. 5) रोजी भैरवनाथ विद्यालय खुटबाव येथे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीन (मतदान यंत्र) प्रत्यक्षात दाखवून ती कशी असते, कशी ऑपरेट होते, मतदान कसे करावे, याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. मतदान यंत्र कसे जोडावे ते कसे सुरु करावे व त्यावरती मतदान कसे करता येते, याविषयी संपूर्ण प्रात्यक्षिक करून घेण्यात आले. हे प्रशिक्षण दौंड तहसीलदार कार्यालयाद्वारे अतुल कुमार खताळ आणि अतुल कुमार कांबळे या अधिकाऱ्यांनी दिले. सदर प्रशिक्षणाचा लाभ भैरवनाथ शिक्षण मंडळातील सुमारे 250 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तसेच विद्यार्थ्यांनी घेतला.
कार्यक्रमाच्या वेळी भैरवनाथ शिक्षण मंडळातील पदाधिकारी सर्व शाखांचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. बी एल ओ शाम कदम व संतोष दोरगे यांनी आभार मानले.