मुंबई : पावसाळ्यानंतरच्या देखभालीचे काम करण्यासाठी मुंबई विमानतळावरील उड्डाण संचालन १७ ऑक्टोबर रोजी सहा तासांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडने (एमआयएल) सांगितले. सुविधेतील दोन क्रॉस रनवेवर विमानतळ तात्पुरते बंद करणे, हा मुंबई विमानतळाच्या वार्षिक पावसाळ्यानंतरच्या प्रतिबंधात्मक देखभाल योजनेचा एक भाग आहे आणि या संदर्भात सहा महिने अगोदर एअरमनला नोटीसदेखील जारी करण्यात आली असल्याचे म्हटले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सर्वसमावेशक पावसाळ्यानंतरच्या धावपट्टी देखभाल योजनेचा एक भाग म्हणून, क्रॉस रनवे आरडब्ल्यूवाय ९/२७ आणि आरडब्ल्यूवाय १४/३२ हे १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते संध्याकाळी ५ यावेळेत कार्यान्वित नसतील.