-बापू मुळीक
सासवड : पुरंदर तालुक्यातील दिवे येथे दोन एकर शेती आई-वडिलांनी नावावर करुन दिली नाही, म्हणून मुलाने दारू पिऊन येऊन त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
दिवे येथे मुक्ताबाई गोकुळ भापकर (रा. भापकर मळा, दिवे) येथील रहिवासी आहे. त्यांना संतोष भापकर हा मुलगा असून, सून आणि नातवंडे हे सर्वजण जेजुरी येथे राहण्यास आहेत. जेजुरी येथे त्यांचे हॉटेल आहे ते चालवून ते त्यांची कुटुंबाची उपजीविका करत आहे. तर त्यांची दोन एकर शेती दिवे येथे आहे.
मुलगा संतोष हा शेती करत असून त्याला दारूचे व्यसन आहे. तो नेहमी आपल्या आई-वडिलांना म्हणतो की, दोन एकर शेती माझ्या नावावर करा, असे म्हणून दारू पिऊन मारहाण करायचा. तसेच आईवडीलांना वारंवार शिवीगाळ दमदाटी करायचा. मंगळवारी (दि. 01) ऑक्टोबरला संतोष दारू पिऊन येऊन वडिलांना शेतजमीन नावावर करून द्या, नाहीतर मारून टाकीन, अशी धमकी दिली. त्यावेळी त्याला सोडवण्यासाठी गेले असता, त्याने आईला सुद्धा हाताने, लाकडी दांडक्याने मारहाण केली.
यावेळी नातवंडे, सून सुद्धा सोडवण्यासाठी आले असता. त्यांना सुद्धा मारहाण करण्यात आली. यामुळे अशा स्थितीत घरातून बाहेर काढून हाकलून दिले. त्यामुळे भापकर यांनी सासवड पोलीस स्टेशनमध्ये जावून याप्रकरणी सविस्तर तक्रार दाखल केली.
याबाबत पोलीस हवालदार अभिजीत कांबळे यांनी तक्रार दाखल करून घेतली. याप्रकरणी पुढील तपास सासवडचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी तसेच पोलीस हवालदार सुहास लाटणे करीत आहेत