उरुळी कांचन, (पुणे) : धनगर समाजाला एसटीतून आरक्षण देण्यात यावे. त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, या मागणीसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने उरुळी कांचन (ता. हवेली) येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे पुणे – सोलापूर महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शेवटी उरुळी कांचनच्या मंडलाधिकारी नूरजहाँ सय्यद यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले आहे.
यावेळी रास्ता – रोको आंदोलनात धनगर समाज बांधवांनी आरक्षणाच्या अमलबजावणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली. अनेकांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी सरपंच सागर थोरात, मारुती थोरात, माजी सरपंच मारुती बरकडे, गणेश मेमाणे, गोरख थोरात, दगडोबा थोरात, दशरथ कोळपे, ज्ञानोबा ठोंबरे, रामभाऊ बोधे, दिलीप गाडेकर, राहुल आगलावे, बळीराम डूबे, बाबासाहेब गायकवाड, बाबुराव तरंगे, अतिश मदने, विष्णू मदने, सुजित वगरे, अविनाश यमगर, धनाजी सातपुते, समीर कोळपे, अतुल कोळपे, भाऊसाहेब गडदे, संतोष गवते, आकाश कुरकुंडे, भानुदास थोरात, योगेश कोळपे, रमण थोरात, काळूराम थोरात, विठ्ठल नाना घुले तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, उरुळी कांचन पंचक्रोशीतील तरडे, हिंगणगाव, मिरवडी, नांदूर, बुर्केगाव, खामगाव टेक, कोरेगाव मूळ, बोरीभडक, उरुळी कांचनसह परिसरातील धनगर समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन आणि प्रस्तावना अजय गाढवे यांनी तर आभार आप्पा वाघमोडे यांनी मानले.
धनगर समाजाच्या मागण्या..
1. खिलारे धनगर प्रमाणपत्र त्वरित रद्द करावे.
2. धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी तात्काळ करावी.
3. एसटी चे उपवर्गीकरण करून धनगरांसाठी एसटी-बी मध्ये आरक्षित करावे.
4. राज्य सरकारने धनगड आणि धनगर एकच आहे असा जीआर तत्काळ काढावा.