लोणी काळभोर, (पुणे) : आजकाल उच्च शिक्षणाला जास्त महत्त्व दिले जाते परंतु याचा पाया असणाऱ्या प्री स्कूल आणि मदर टॉडलर प्रोग्रामही तितकाच महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. महेश चोपडे यांनी केले.
कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील क्रेयॉन्स प्रीस्कूल या शाळेत क्रेऑन्स मदर टॉडलर प्रोग्रॅमचे उद्घाटन महेश चोपडे यांच्या हस्ते शनिवारी (ता. १९) करण्यात आले. यावेळी चोपडे बोलत होते.
यावेळी लोणी काळभोरच्या सरपंच माधुरी काळभोर, माजी उपसरपंच ज्योती काळभोर, ग्रामपंचायत सदस्य ललिता काळभोर ग्रामपंचायत सदस्य सविता लांडगे, क्रेयॉन्स प्रीस्कूलचे संस्थापक कमलेश काळभोर, प्राचार्य हर्षदा बारवकर, व्यवस्थापक सोनाली मोरे, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पॅरा ऑलिंपिक स्विमर कुमारी स्वप्नाली रतन तांबे यांना राष्ट्रीय स्पर्धेत रौप्य पदक मिळवल्याबद्दल व एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून विशेष सत्कार करण्यात आला.
सरपंच माधुरी काळभोर म्हणाल्या “क्रेयॉन्स शाळा नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असते ज्यामधून विद्यार्थ्यांचा संपूर्ण विकास होण्यास मदत होते. क्रेयॉन्स शाळेला त्यांच्या उज्ज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा.”
प्री स्कूलचे संस्थापक कमलेश काळभोर म्हणाले, ” १ ते २.५ वर्षांच्या बालकांसाठी हा विशेष प्रोग्राम क्रेयॉन्स प्री स्कूलच्या वतीने लोणी काळभोर येथे प्रथमच सुरू करण्यात आला आहे. आई व मुलांचे नाते हे जगातील सर्वात सुंदर नाते असून ते अधिक वृद्धिंगत करण्यासाठी या प्रोग्रामचा विशेष उपयोग होईल. यामुळे मुलांना आईबरोबर शाळेत जाण्याचा आनंद घेता येईल.”
प्राचार्य हर्षदा बारवकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभार सोनाली मोरे यांनी मानले.