अजित जगताप
सातारा : खटाव तालुक्यातील वडूज या ठिकाणी भाजपच्या महिलांचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात उपस्थित महिलांना शासकीय योजनांच्या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली.
या महिला मेळाव्याला भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सुरभी भोसले, तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण व महिला तालुकाध्यक्ष सौ. वृषाली विक्रम रोमण तसेच वडूज नगरीच्या नगराध्यक्ष सौ मनीषा काळे यांच्या उपस्थितीमध्ये महिला मेळावा संपन्न झाला.
आज देशामध्ये राष्ट्रेपती सारख्या सर्वोच्चपदी आदिवासी महिलेची निवड करून भाजपाने स्त्री-पुरुष समानतेचा संदेश दिला असल्याने राजकीय पटलावर महिलांचा सन्मान करणारा पक्ष म्हणून भाजपकडे पाहण्यात येते, असे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोरी पाटील यांनी, सूत्रसंचालन चंद्रकांत कोकाटे यांनी तर रेश्मा बनसोडे यांनी आभार मानले.