पुणे: सध्याच्या काळात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी अनिश्चितता पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारपेठेत सोन्याने प्रति औंस 4220 डॉलरचा पल्ला गाठला आहे, ज्यामुळे अनेक गुंतवणूकदार चिंतेत आहेत.

बाजारातील स्थिती पाहता, गेल्या आठवड्यात सोन्याचे दर घसरून 3940 डॉलरपर्यंत खाली आले होते. मात्र, अवघ्या काही दिवसांतच सोन्याने 250 डॉलरची मोठी उसळी घेतली आहे. चांदीच्या बाबतीतही असेच चित्र असून, ती 55 डॉलरवरून 63 डॉलरपर्यंत पोहोचली आहे, म्हणजेच चांदीच्या किमतीत थेट 12 ते 13 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

सध्याच्या परिस्थितीत आर्थिक तज्ज्ञ गुंतवणूकदारांना विचार करून असा सल्ला देत आहेत. जागतिक बाजारात सोन्याचा भाव 4120 ते 4130 डॉलरच्या दरम्यान आल्यास, ती खरेदीसाठी एक चांगली संधी ठरू शकते. भारतीय बाजारपेठेत, जेव्हा सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,46,350 रुपयांच्या आसपास येईल, तेव्हा पुन्हा एकदा मोठ्या खरेदीची लाट येऊ शकते. त्यामुळे गुंतवणूक करताना या जागतिक घडामोडींकडे बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे.






