नवी दिल्ली : सध्या WhatsApp वर अनेक भन्नाट असे फीचर्स आणले जात आहेत. त्यात आता कंपनीने युजर्सना Status मध्ये एक जबरदस्त फीचर दिले आहे. या फीचरच्या माध्यमातून युजरला तुमचा Status नक्की दिसू शकले. म्हणजेच तुम्ही ज्या व्यक्तीसाठी हे Status ठेवणार आहात त्याला हे Status दिसणार आहे.
WhatsApp युजर्स अनेकदा विशिष्ट हेतूसाठी किंवा विशिष्ट व्यक्तीसाठी Status पोस्ट करतात. मात्र, अनेकदा असं होतं की, Status ची कालमर्यादा संपली तरी ज्या व्यक्तीसाठी हे Status पोस्ट केले आहे त्याला ते पाहता येत नाही. यामुळे Status पोस्ट करणाऱ्या व्यक्तीची निराशा होत होती. मात्र, आता असे होणार नाही. व्हॉट्सॲपने ही समस्या सोडवली आहे. कंपनीकडून आता Status Mention फीचर आणले जात आहे.
या फीचरच्या मदतीने तुम्ही ज्या व्यक्तीसाठी Status बनवले आहे त्या व्यक्तीचे नाव किंवा संपर्क नमूद करण्याचा पर्याय तुम्हाला मिळेल. संपर्काचा उल्लेख होताच तुमच्या Status चा Alert मिळू शकले. नोटिफिकेशन मिळाल्यानंतर समोरच्याला कळेल की तुम्ही त्यांच्यासाठी स्टेट्स सेट केले आहे आणि ते हे Status पाहू शकतील.