जळगाव : राज्यात महिलांवर लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढताना दिसत आहे. बदलापूर येथील घटनेनंतर राज्यात अनेक घटना घडल्या आहेत. अशातच आता अत्याचाराच्या घटनेने जळगाव हादरले आहे. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे दोन सख्ख्या बहिणीवर अत्याचार करण्यात आले आहे.
विनोद बारेला असे आरोपीचे नाव आहे.
या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, 10 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर च्या दरम्यान या नराधमाने दोन्ही अल्पवयीन सख्ख्या बहिणींवर दोन वेळा अत्याचार केला आहे. आरोपी बारेला याने अत्याचार केल्यानंतर घरात कुणाला सांगितले तर दोघांना मारून टाकण्याची धमकी दोन्ही मुलींना दिली आहे. दरम्यान पीडित मुलींनी हा प्रकार तिच्या आईला सांगितला त्यानंतर तिच्या आईने थेट धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली व संशयित आरोपी विनोद बारेला याच्या विरोधात तक्रार दिली.
प्रकरणी बाल लैंगिक अत्याचार अधिनियम कायद्यानुसार संशयित आरोपी विनोद बारेला याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला गजाआड करण्यात आले आहे.