उरुळी कांचन, (पुणे) : कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी राजाराम जयसिंग भंडारे यांची तर उपाध्यक्षपदी संतोष भगवान कानकाटे यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
मावळते अध्यक्ष प्रितम शितोळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया कोरेगाव मूळ येथील ग्रामपंचायत हद्दीत शुक्रवारी (ता.13) सरपंच भानुदास जेधे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या निवडणुकीत अध्यक्षपदी राजाराम भंडारे यांची तर उपाध्यक्षपदी संतोष कानकाटे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी माजी सरपंच मंगेश कानकाटे, उपसरपंच अश्विनी कड, ग्रामपंचायत सदस्या राधिका काकडे, पोलीस पाटील वर्षा कड, आप्पा कड, संतोष काकडे, प्रवीण शितोळे, मुकिंदा काकडे, हरिभाऊ बोधे, नंदकिशोर कड, शुभम शिंदे, चेतन कानकाटे, चिंतामणी कड, ठकसेन कड, काकडे रामदास, भाउ यादव, अजीत काकडे, अमर आतकर, अजिंक्य कड, श्रेयश भंडारे, सुरज बोधे, अनिकेत बोधे, अभिजीत चितळकर, समिर बोधे, शुभम बोधे, सुरज बोधे, रमेश बोधे, स्वप्नील बोधे, शुभम भंडारे, शरद मोरे, समाधान अवचट आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.