पुणे : राजस्थानमधील भिलवाडा येथील एका व्यक्तीला आयकर विभागाने ६६ कोटींच्या थकबाकीची नोटीस पाठवली आहे. कार्यालयात न आल्यास दहा हजार रुपयांचा दंडही भरावा लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे हुरडा गावात राहणाऱ्या या व्यक्तीचे नाव गोविंद असून तो मजुरी करतो. रोजनदारीवर तो रंगारी म्हणून काम करतो. यातून तो एका महिन्यात 8-10 हजार रुपये कमवू शकतो. या पैशातून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. अशा हलखीच्या स्थितीत त्याला आयकर विभागाची नोटीस मिळाल्याने तो घाबरला आहे.
गुरुवारी, 14 जुलै रोजी गोविंद याने आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यातून त्याच्याकडे 66 कोटी आयकर थकीत असल्याचे समोर आले. त्याने अधिकार्यांना सांगितले की, 2018 मध्ये तो विजयनगर येथे मजूर म्हणून काम करत होता. येथे भेटलेल्या गिरधर नावाच्या तरुणाने त्याला नोकरी मिळवून देणार असल्याचे सांगितले. त्यानंतर बँक खाते उघडण्यासाठी त्याने माझे आधार आणि पॅनकार्ड घेतले. मला माझी नोकरी मिळाली नाही किंवा माझी कागदपत्रेही परत केली नाहीत, असे त्याने सांगितले.
व्यवसायाने मजूर असल्याचेही गोविंदने अधिकाऱ्यांना सांगितले. रंगरंगोटीचे काम करून ते महिन्याला केवळ 8-10 हजार रुपये कमावतात. गोविंदने सांगितले की, आयकर विभागाने ६६ कोटींच्या थकबाकीची नोटीस पाठवली आहे. ज्यामध्ये कार्यालयात न आल्यास दहा हजार रुपये दंडही भरावा लागेल, असा इशारा देण्यात आला आहे. त्याला सोमवारी पुन्हा अजमेर कार्यालयात बँक खात्याच्या सर्व कागदपत्रांसह बोलावण्यात आले आहे.
दरम्यान, नोटीस मिळाल्यानंतर गोविंदच नव्हे तर त्यांचे कुटुंबीयही घाबरले आहेत. शहरातील भील बस्ती येथे बांधलेल्या एका खोलीत तो आपल्या कुटुंबासह राहतो. मजुरी मिळाली नाही तर उपाशी राहावे लागते, अशी या कुटुंबाची अवस्था आहे.