सासवड : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सासवड शाखेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विधीज्ञ दिलिप केशवराव निरगुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सासवड येथील आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानच्या कार्यालयात आयोजित साहित्य परिषदेच्या कार्यकारणी सभेत पाच वर्षांसाठी ही निवड करण्यात आली आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते, साहित्य परिषदेचे मावळते अध्यक्ष ॲड आण्णासाहेब खाडे यांसह कार्यकारणी सदस्य यावेळी उपस्थित होते.
या प्रसंगी निवडण्यात आलेली कार्यकारणी पुढील प्रमाणे : अध्यक्ष – ॲड दिलीप केशव निरगुडे, उपाध्यक्ष – ॲड कलाताई निवृत्ती फडतरे व डॉ राजेश विजय दळवी, कार्याध्यक्ष – सतीश अनंतराव पाटील, कार्यवाह – बाळासाहेब दिनकर मुळीक व संतोष एकनाथ काकडे, सह कार्यवाह – संदिप चंद्रकांत टिळेकर आणि कोषाध्यक्ष – सुनिल पांडुरंग लोणकर.
या सभेत सांस्कृतीक समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार हेमंत चंद्रकांत ताकवले, प्रसिद्धी समितीच्या अध्यक्षपदी विद्या रमेश जाधव, तर कार्यक्रम समितीचे अध्यक्ष म्हणून ॲड प्रकाश म्हाळसाकांत खाडे यांची निवड करण्यात आली आहे. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे निवडीनंतर स्वागत करण्यात आले. विजय कोलते व अण्णासाहेब खाडे यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
नवनियुक्त अध्यक्ष ॲड दिलिप निरगुडे यांनी सर्वांच्या एकत्रित सहभागातून परिषदेचे कामकाज अधिक गतिमान केले जाईल, असा विश्वास व्यक्त केला. हेमंत ताकवले यांनी आभार प्रदर्शन केले. दादा मुळीक, अक्षय पवार, शांताराम कोलते यांनी सभेचे आयोजन केले. विजय कोलते, सुरेश कोडीतकर, वसंत ताकवले, केशव काकडे, बंडुकाका जगताप, कुंडलिक मेमाणे, जगदीश शेवते, शिवाजीराव घोगरे हे कार्यकारणी सदस्य यावेळी उपस्थित होते.