बापू मुळीक
सासवड: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या ८४ व्या वर्धापन दिनानिमित्ताने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शेठ गोविंद रघुनाथ साबळे पदवी व पदविका महाविद्यालयामध्ये कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमामध्ये बोलताना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. राजश्री चव्हाण यांनी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या प्रवासावर प्रकाश टाकला व गरजू विद्यार्थ्यांना विविध प्रकारे कशी मदत केली जाते हे सांगितले.
वर्धापन दिनानिमित्ताने रांगोळी स्पर्धा व पथनाट्य स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी PDEA, स्वर्गीय बाबुरावजी घोलप व गणेशोत्सव या विषयांवरती रांगोळ्या काढल्या. पथनाट्य स्पर्धेतदेखील विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग घेतला. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मानसिक स्वास्थ्य व्यवस्थापन, सायबर सुरक्षा आणि डिजिटल साक्षरता, युवा सक्षमीकरण आणि शिक्षण या विषयांवर पथनाट्य सादर केली. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. राजश्री चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. दिपाली जगताप, डॉ. प्रज्ञा जगताप, प्रा.शितल जगताप व मूल्य मापन प्रा.विशाखा गायकवाड, प्रा. जयश्री नाळे, प्रा. सागर भिसे, प्रा. विपुल धसाडे यांनी केले.