Bigg Boss Marathi Suraj Chavan : बिग बॉस मराठी सध्या सर्वत्र गाजत असून यंदाच्या सीझनमध्ये रील स्टार सूरज चव्हाणने चांगलीच छाप पाडली आहे. बिग बॉस मराठी कधीच न पाहणाऱ्या व्यक्तींना सूरज चव्हाणने बिग बॉस पाहण्यासाठी भाग पडले आहे. कारण गुलिगत धोका म्हणून सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेल्या त्याच्या डायलॉग वरून आणि गरिबीतून आलेल्या सूरजची एन्ट्री झाल्यानंतर अनेकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली होती.
मात्र, सूरजने घरातील वावर आणि आपल्या स्ट्रगलबद्दल इतर सदस्यांना सांगितल्यानंतर प्रेक्षकांमध्ये त्याच्याबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाले. अनेकजण सूरजला पाठिंबा देत आहे. तर, दुसरीकडे एका कीर्तनकारांनीदेखील सूरजचे भरभरून कौतुक केले आहे. जेव्हा कधी टोकाचा निर्णय घेण्याचा विचार कराल तेव्हा सूरज चव्हाणला आठवा, असे आवाहन कीतर्नकार प्रा. निलेश महाराज कोरडे यांनी केले आहे. सध्या याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
काय म्हणाले निलेश महाराज कोरडे?
कीतर्नकार प्रा. निलेश महाराज कोरडे म्हणाले कि, ‘बिग बॉस’ चांगलं की वाईट हा प्रश्न बाजूला ठेवा. पण येथे बसलेल्या सर्वांना एक वाक्य सांगतो आयुष्यात कधीही आत्महत्येचा विचार मनात आला, तर त्या गोलीगत सूरज चव्हाणकडे पाहा आणि कोरोना काळात स्वत:ला संपल्याची जाणीव ज्याला झाली होती. तो डीपीदादा म्हणजेच धनंजय पोवार आठवून पाहा. वडील गेले तेव्हा सूरज गोट्या खेळत होता. तेव्हा लोकांनी त्याला येऊन सांगितलं की, तुझे वडील गेले.
View this post on Instagram
त्यानंतर त्याने गोट्या तशाच खिशात घातल्या आणि बापाचं शेवटचं तोंड पाहिलं. बिचाऱ्याला तेव्हा काही कळतही नव्हतं. त्यानंतर आईच्या उपचाराला पैसे मिळाले नाहीत. त्याने सगळ्यांकडे पैसे मागितले. पण तेव्हा कोणी पैसे दिले नाही. तेव्हा खोकून खोकून आई गेली, पण तो काही करू शकला नाही, असे कीतर्नकार प्रा. निलेश महाराज कोरडे यांनी म्हटले आहे.
“फक्त गणपती बसवायचा म्हणून सूरज तीन दिवस कामाला गेला आणि काबाडकष्ट केले. गणपतीपुरते पैसे जमा केले. पण वेड्याबरोबर काय राहायचं म्हणून गावातल्यांपैकी कुणी गणपती बसवायला आलं नाही. पण त्याने एकट्याने गणपती बसवला आणि त्याच गणपती बाप्पाचा आशीर्वाद पाहा. तिसऱ्या आठवड्यात तो पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा जीवन संपल्याची जाणीव होईल तेव्हा एकदा ‘बिग बॉस’ हा सीझन आठवून पाहा.