अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : शिरुरसह इनामगाव व मांडवगण फराटा येथे काही जण देशी-विदेशी दारुच्या बाटल्यांची विक्रीकरणाऱ्यांवर शिरुर पोलिसांनी छापे टाकत कारवाई केली आहे. शिरुरसह इनामगाव व मांडवगण फराटा येथे काही जण देशी-विदेशी दारुच्या बाटल्यांची विक्री करत असल्याची माहिती शिरुर पोलिसांना मिळाली असता सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कदम, पोलीस हवालदार संपत खबाले, अमोल गवळी, किशोर वाघ, भाऊसाहेब टेंगले, तानाजी बाबर यांनी तांदळी सह इनामगाव व मांडवगण फराटा या गावामध्ये जाऊन छापे टाकले.
यामध्ये त्यांना तांदळी येथे हॉटेल शिवारच्या आडोशाला प्रज्वल भालेराव हा, तर इनामगाव येथील विराज हॉटेल येथे संदीप विटेकर तसेच हॉटेल जय मल्हार येथे जालिंदर साळुंखे आणि मांडवगण फराटा येथील राजमुद्रा हॉटेल येथे सुखदेव चुमन हा नागरिकांना देशी-विदेशी दारुच्या बाटल्यांची विक्री करताना दिसून आले.
यावेळी पोलिसांनी चौघांना वेगवेगळ्या ठिकाणहून ताब्यात घेत दारुसाठा जप्त केला. या छाप्यानंतर पोलिसांनी गणेश सुखदेव चुमन (वय २१ वर्षे रा. जगताप वाडी मांडवगण फराटा ता. शिरुर जि. पुणे) प्रज्वल संतोष भालेराव वय २२ वर्षे व संदीप बबन विटेकर वय ३४ वर्षे, जालिंदर गुलाबराव साळुंखे वय ४४ तिघे (रा. इनामगाव ता. शिरुर जि. पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर पोलीस करत आहे.