पुणे प्राईम न्यूज : कन्नड अभिनेता दर्शन थूगुदीपा आणि त्याची कथित प्रेयसी अभिनेत्री पवित्रा गौडा यांना सोशल मीडियावरून आक्षेपार्ह संदेश पाठविणाऱ्या चाहत्याची जून महिन्यात हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर कर्नाटक चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली. या हत्या प्रकरणात आता बंगळुरू पोलिसांनी 3,991 पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर केले आहे. ज्यामध्ये मृत चाहता रेणुकास्वामीने अभिनेत्री पवित्रा गौडाला कोणते मेसेज पाठवले आहे, याची माहिती देण्यात आली आहे.
मृत चाहता रेणुकास्वामीने पवित्राला त्याच्यासह लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याची ऑफर दिली होती. यासाठी तो तिला दरमहा 10 हजार रुपये देण्यास तयार झाला होता. तसेच मृत चाहता रेणुकस्वामी पवित्राला अश्लील मेसेजेस आणि गुप्तांगाचे फोटोही पाठवत असल्याचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला आहे.
मृत चाहता रेणुकास्वामी काय मेसेज पाठवायचा?
मृत चाहता रेणुकास्वामी सोशल मीडियावर मेसेज पाठवत असल्याचे सांगितले आहे. त्या मेसेजमध्ये तो म्हणाला की, “तू छान दिसतेस. तुझा मोबाईल नंबर दे, प्लिज. तुला माझ्याकडून काय पाहिजे? तुला जे पाहिजे, ते पाठवू का? तू माझ्याशी गुप्त संबंध ठेवशील का? माझ्याबरोबर लिव्ह इनमध्ये राहशील का? मी तुला दरमहा 10 हजार रुपये देईल”, असे काही मेसेज मृत रेणुकास्वामीने पाठविल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.
मृत चाहता रेणुकास्वामीचे असे अश्लील मेसेज सहन न झाल्यामुळे पवित्रा गौडाने पवनला रेणुकास्वामीच्या मेसेजला पाहून घेण्यास सांगितले होते. रेणुकास्वामीला जाळ्यात अडकविण्यासाठी पवनने पवित्रा गौडाच्या नावे त्या चाहत्यासोबत मेसेज करायला सुरुवात केली. त्यानंतर रेणुकास्वामीशी चॅटिंगमधून जवळीक वाढवत तो कुठे राहतो, काय करता या सा-या गोष्टींची माहिती पवनने काढली.
या प्रकरणी बंगळुरूच्या पोलिसांनी 65 फोटोही गोळा केले आणि ते आरोपपत्रात जोडले आहेत. दरम्यान या प्रकरणी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपपत्र दाखल झाल्यामुळे आता अभिनेता दर्शनच्या वकिलांकडून जामीनासाठी अर्ज दाखल करण्याची शक्यता वर्तवली आहे. ज्या शेडमध्ये मृत चाहता रेणुकास्वामीला आणले गेले आणि तिथे त्याच खून झाला, त्या शेडचा वॉचमन या खटल्यातील प्रमुख साक्षीदार आहे. त्यानेच अभिनेता दर्शन आणि पवित्रा गौडाला तिथे येताना पाहिले होते. तसेच शेडमधील दोन मजुरांनी मृत चाहता रेणुकास्वामीचा छळ प्रत्यक्ष पाहिला होता.
दरम्यान, अभिनेता दर्शन, अभिनेत्री पवित्रा गौडा यांच्यासह एकूण 17 जण या गुन्ह्यात आरोपी आहेत. मृत चाहता रेणुकास्वामी याचा खून होण्यापूर्वी घेतलेला एक फोटो सध्या समोर आला आहे.