पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा (मुख्य) परीक्षा – २०२१च्या लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी व प्रमाणपत्र पडताळणी २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने एका परिपत्रकाद्वारे शुक्रवारी (ता.१८) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
आयोगाचे सम क्रमांकाचे दिनांक ९ नोव्हेंबर २०२२ व दिनांक १५ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रसिध्दीपत्रकाद्वारे सांगितले होते.
त्यानुसार १८ नोव्हेंबर २०२२ पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा (मुख्य) परीक्षा-२०२१ च्या लेखी परीक्षेच्या शारीरिक चाचणी व प्रमाणपत्र पडताळणी कार्यक्रम दिनांक २८ नोव्हेंबर २०२२ ते दिनांक २ डिसेंबर २०२२ या कालावधीत राज्य राखीव पोलीस बल, गट क्रमांक १ व गट क्रमांक २ रामटेकडी, हडपसर, पुणे येथे घेण्यात येणार आहे.