मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील उज्जैन मधून एक भयंकर घटना समोर आली आहे. भरदिवसा फुटपाथवर एका नराधमाने ४५ वर्षीय भिकारी महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने सर्वच थक्क झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने महिलेला दारू पाजून आपल्या वासनेची शिकार बनवली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
ही घटना कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोयला फाटक परिसरात असलेल्या पेट्रोल पंपाजवळील फूटपाथवर घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. लोकेश असं नराधम आरोपीचे नाव आहे. सुमारे 7 वर्षांपूर्वी पीडित महिला आपल्या कुटुंबासह उज्जैन येथे राहण्यासाठी आली होती. महिला फूटपाथवर राहते. लोकेशने महिलेला फूस लावून तिला दारू पाजली आणि तिच्यावर बलात्कार केला.
नेमकं काय घडलं?
याबाबत माहिती देताना कोतवाली पोलिस ठाण्याचे सीएसपी ओमप्रकाश मिश्रा म्हणाले की, पोलिस स्टेशन परिसरात एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. याची तातडीने दखल घेत कारवाई करण्यात आली आहे. चिमणगंज पोलीस स्टेशन हद्दीजवळ राहणाऱ्या ४५ वर्षीय भिकारी महिलेसोबत बलात्काराची घटना समोर आली आहे. दरम्यान, आरोपी लोकेशने महिलेला आधी दारू पाजली आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणात व्हिडिओच्या माध्यमातून आरोपीची ओळख पटवून त्याला अटक करण्यात आली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे या महिलेवर बलात्कार होत असताना अज्ञात व्यक्तीने या घटनेचा व्हिडीओ काढून व्हायरल केला आहे. मात्र त्या तरुणाला तिच्यावर बलात्कार करण्यापासून रोखले नाही. या प्रकरणी पोलीस व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीचीही माहिती गोळा करत असून, त्यानंतर त्याच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.