नवी दिल्ली : जागतिक चलन बाजारात भारताच्या रुपयाच्या मूल्यात घसरण झाल्याचे दिसून आले. एका डॉलरच्या तुलनेत रुपया 84.02 पर्यंत पोहोचला. इतक्या मोठ्या प्रमाणात घसरण होण्याचे ही पहिलीच वेळ आहे. देशांतर्गत शेअर बाजारात ही मोठी घसरण झाली होती. ज्यामुळे रुपयाची ही ऐतिहासिक घसरण झाली आहे.
कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. ज्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाला आहे. ब्रेंट क्रूड तेल प्रति बॅरल 73 डॉलरच्या खाली आली आहे. तर डब्लूटीआय क्रूड ऑईल प्रति बॅरल 70 डॉलरच्या खाली घसरले आहे. एका डॉलरच्या तुलनेत रुपया 84 रुपयांच्या खाली घसरण्याची ही पहिलीच वेळ आहे. चलन बाजाराच्या तुलनेत रुपया एका डॉलरच्या तुलनेत 83.96 च्या पातळीवर उघडला आणि दिवसभर 83.95 ते 84.01 च्या श्रेणीत व्यवहार करत राहिला.
एका डॉलरच्या तुलनेत रुपया प्रथमच 84 च्या खाली घसरला आहे. देशांतर्गत बाजार आणि जागतिक बाजारातील गोंधळ यामुळे रुपयावर हा दबाव दिसून आला. व्यवहाराच्या शेवटच्या तासांत डॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठी घसरण झाल्याचे बुधवारी पाहिला मिळाले.