अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : कवठे येमाई ता. शिरुर येथील तेरा वर्षीय अल्पवयीन मुलगी शिरुर येथील शाळेमध्ये जात असताना वैभव शेळके हा युवक वारंवार मुलीचा पाठलाग करत मुलीच्या मनास लज्जा निर्माण होईल असे वर्तन करु लागला होता. या दरम्यान वैभव याने मुलीला जीवे मारण्याची धमकी देखील दिल्याने मुलीने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला.
मुलीच्या आईने शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. पोलिसांनी वैभव शेळके याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार हे करत आहे.