उरुळी कांचन, (पुणे) : पूर्व हवेलीतील बहुचर्चित कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भानुदास खंडेराव जेधे यांची 8 विरुद्ध 2 मतांनी निवड झाली आहे. माजी सरपंच विठ्ठल शितोळे यांना 2 मते मिळाली. तर एक मत बाद झाले.
कोरेगाव मूळचे मावळते सरपंच मंगेश कानकाटे यांनी कांही दिवसापुर्वी ठरल्याप्रमाणे आपल्या सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने गोरख बबनराव कानकाटे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी नूरजहा सय्यद यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या निवडणुकीत सरपंच पदासाठी निर्धारीत वेळेत भानुदास जेथे व विठ्ठल शितोळे यांनी अर्ज दाखल केले होते.
सरपंचपदासाठी भानुदास जेथे व विठ्ठल शितोळे या दोघांचे उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने, निवडणूक निर्णय अधिकारी नूरजहा सय्यद यांनी निवडणुकीची घोषणा केली. प्रत्यक्ष झालेल्या निवडणुकीत भानुदास जेथे यांना 8 तर विठ्ठल शितोळे यांना 2 मते पडली. तर एक मत बाद झाले. यामुळे भानुदास जेथे यांची सरपंचपदी निवड झाल्याची घोषणा नूरजहा सय्यद यांनी केली.
दरम्यान, निवड होताच कार्यकर्त्यांनी गुलाल व फटाक्यांच्या आतिषबाजी करीत मोठा जल्लोष केला. यावेळी तलाठी केतन जाधव व कोरेगाव मूळ ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी प्रल्हाद पवार यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले.
यावेळी उपसरपंच अश्विनी कड, ग्रामपंचायत सदस्य बापूसो बोधे, दत्तात्रय काकडे, माजी उपसरपंच वैशाली अमित सावंत लिलावती बोधे, राधिका काकडे, मनीषा नंदकिशोर कड, पल्लवी नाझीरकर, सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब कड, ताराचंद कोलते, चिंतामणी कड, अमित सावंत, संतोष काकडे, दिलीप शितोळे, उद्योजक संतोष गायकवाड, जयसिंग भोसले, सुनील खेडेकर, कचरू कड, नितीन कड, प्रवीण शितोळे, गणेश शितोळे, संतोष शितोळे, अजिंक्य कड, राजाराम भंडारे समस्त ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.