सासवड : भिवडी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी डॉ. मनोहर शिदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सहाय्यक निबंधक श्रीकांत श्रीखंडे हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. तसेच पुरंदर नागरी पतसंस्थचे मार्गदर्शक अनिल उरवणे, सचिव जालिंदर बाठे, तात्यासाहेब भिताडे, विठ्ठल आबा मोकाशी, साधू भाऊ दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली.
यावेळी संचालक माजी चेअरमन नितीन गायकवाड, बापू खटाटे, बापू मोकाशी, मंदा मोकाशी, संतोषभाऊ भिंताडे, संतोष दिघे, महादेव काळे, अरुण झेंडे, रवी भिंताडे, बंडा पवार, ग्रामपंचायत सरपंच श्वेता चव्हाण, ग्रामपंचायत उपसरपंच विजय भिंताडे, ग्रामपंचायत सदस्य संजय दिघे व भिवडी ग्रामस्थ उपस्थित होते.
निर्वाचित चेअरमन डॉ. मनोज शिंदे यांचा सन्मान श्रीखंडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. व विठ्ठल आबा मोकाशी यांच्या हस्ते अनिल उरवणे एक आणि दळवी यांचा व सर्व संचालक आणि ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार करण्यात आला. साधूभाऊ दिघे यांनी आभार मानले.