मुंबई : विक्रम-S या भारताच्या पहिल्या खासगी रॉकेटचे शुक्रवारी सकाळी 11.30 वा. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
या सिंगल स्टेज रॉकेटची निर्मिती स्कायरूट एअरोस्पेस या भारतीय सार्टअपने केली आहे. ही एक प्रायोगिक मोहीम असून, त्यात 3 पेलोड्स पृथ्वीपासून 89.5 किमीच्या उंचीवर नेण्यात आले. त्यानंतर रॉकेट समुद्रात स्पॅल्शडाउन म्हणजे कोसळले.
इस्त्रोने (ISRO) आज नवा इतिहास रचला आहे. देशातील पहिल्या खासगी रॉकेटचं (First Private Rocket) आज प्रक्षेपण करण्यात आलं. स्कायरुट एरोस्पेस या कंपनीकडून हे रॉकेट तयार करण्यात आलं आहे. या रॉकेटला १५ नोव्हेंबरला लॉन्च करण्यात येणार होतं.
मात्र, वाईट हवामानामुळे आज या रॉकेटचं प्रक्षेपण करण्यात आलं. आंध्रप्रदेशच्या श्रीहरीकोटा येथून या रॉकेटने उड्डाण घेतलं.
स्कायरूट एरोस्पेसने या कंपनीने त्यांच्या या पहिल्या प्रकल्पाला प्रारंभ असं नाव दिलंय. स्कायरूटसाठी हे मिशन एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो, कारण पुढील वर्षी प्रक्षेपणासाठी नियोजित असलेल्या विक्रम-1 ऑर्बिटल वाहनामध्ये वापरल्या जाणार्या 80 टक्के तंत्रज्ञानाची पडताळणी करण्यास मदत होईल.
१०० किमी झेप घेतल्यानंतर हे रॉकेट समुद्रात कोसळणार आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थाने 100 स्टार्ट अप्सने अंतराळ तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण क्षेत्रात काम करण्यासाठी ISRO सोबत करार केला आहे. 100 पैकी जवळपास 10 अशा कंपन्या आहेत, ज्या उपग्रह आणि रॉकेट विकसित करण्यात गुंतलेल्या आहेत.
यावेळी त्यांनी चांद्रयान III बद्दल माहिती देताना सांगितले की ते लवकरच प्रक्षेपित केले जाईल. एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की अनेक मोहिमा आहेत ज्यावर इस्रो आणि अमेरिकन अंतराळ संस्था नासा एकत्र काम करत आहेत.
विक्रम एस हे फक्त 6 मीटर उंच सिंगल स्टेज स्पिन स्टॅबिलाइज्ड सॉलिड प्रोपेलेंट रॉकेट आहे. ते 422 न्यूटनचा जास्तीत जास्त थ्रस्ट जनरेट करते. यात 4 स्पिन थ्रस्टर्स आहेत. या रॉकेटचे वजन सुमारे 550 किलो आहे. हे कलाम 80 प्रोपल्शन सिस्टीमद्वारे चालते, ज्याची 15 मार्च 2022 रोजी सोलर इंडस्ट्रीज, नागपूर येथे चाचणी घेण्यात आली होती.
स्कायरूटचे बिझनेस डेव्हलपमेंट लीड सिरीश पल्लीकोंडा म्हणाले की, मिशनचा उद्देश कस्टमर पेलोडसह विक्रम-I लाँच करण्यासाठी स्टेज सेट करणे आहे. 2023च्या दुसऱ्या तिमाहीत विक्रम-1 रॉकेटचे पहिले प्रक्षेपण करण्याचे लक्ष्य आहे आणि स्टार्टअपकडे कस्टमरही आहेत.