शिक्रापूर : कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील शांताराम साळके यांचा कारखान्याला ऊस तोडून देण्याचा व्यवसाय असून शांताराम यांना ऊस तोडणीसाठी कामगार पुरवितो, असे म्हणून तब्बल ९ लाख २५ हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना घडली. या प्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे भीमा एकनाथ पवार, गोकुळ जबू राठोड व प्रेमसिंग बाबू राठोड या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील शांताराम साळके यांचा कारखान्यांना ऊस तोड करुन पुरवण्याचा ठेका असून ते ऊस तोडणीसाठी वेगवेगळ्या ठिकाणहून ऊस तोड कामगार आणत असतात. त्यांच्या व्यवसायातून त्यांची भीमा पाटील या इसमासोबत ओळख झाली; त्यांना भीमा पाटील, गोकुळ राठोड व प्रेमसिंग राठोड यांनी यांनी ऊसतोड कामगार देतो असे भासवून कामगारांना अॅडव्हान्समध्ये पैसे देण्यासाठी काही पैशांची वेळोवेळी मागणी केली असता शांताराम यांनी त्यांना वेळोवेळी मोबाईलवर ऑनलाईन तसेच रोख असे तब्बल ९लाख २५ हजार रुपये पाठविले. मात्र, त्यानंतर देखील कामगार येत नसल्याने शांताराम यांनी तिघांशी संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क झाला नाही.
आपली फसवणूक झाली असल्याचे शांताराम यांच्या निदर्शनास आल्याने याबाबत शांताराम ज्ञानद्देति साळके (रा. कोरेगाव भीमा ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस हवालदार महेंद्र पाटील हे करत आहे.