पुणे : मराठी सिनेसृष्टीमधून एक दुःखद बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं निधन झालं आहे. पुण्यातील राहत्या घरी सुहासिनी देशपांडे यांनी अखेरचा श्वास घेतला. वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान सुहासिनी यांच्या निधनाने कलाविश्वात शोककळा पसरली आहे.
सुहासिनी देशपांडे यांनी मराठीसह हिंदीतील अनेक सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची एक वेगळीच छाप सोडली आहे. अनेक सिनेमांमधून सुहासिनी यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली असून त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीचं मोठं नुकसान झाल्याची भावना व्यक्त होताना दिसत आहे.
सुहासिनी देशपांडे यांचा जीवनप्रवास..
सुनासिनी देशपांडे मनाचा कुंकू (1981), कथा (1983), आज झाले मुक्त मी (1986), आई शप्पथ…! (2006), चिरंजीव (2016), धोंडी (2017) या सिनेमांमध्ये काम केलं असून त्यांनी सिंघम या हिंदी सिनेमातही भूमिका पार पडली आहे. कथा अकलेच्या कांद्याची, राजकारण गेलं चुलीत आणि सासुबाईंचं असंच असतं नाटकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत. त्यांच्या रंगभूमीवरील योगदानासाठी आणि कार्याबद्दल सुहासिनी देशपांडे यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेतर्फे जयंतराव टिळक स्मृती जीवनगौरव पुरस्काराने 2015 साली सन्मानित करण्यात आलं.