नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात सातत्याने चढउतार पाहिला मिळत आहे. जर तुम्ही सणासुदीच्या काळात सोन्यात गुंतवणूक करण्याचा किंवा दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर खरेदीसाठी ही योग्य वेळ आहे. कारण, येत्या आठवडाभरात सोन्याच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या सोन्याचे दर कमी झाल्याचे पाहिला मिळत आहे
मंगळवारी देशात सोन्याचा भाव 73,000 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. सर्वाधिक शुद्धता असलेल्या 24 कॅरेट सोन्याची किंमत 73,030 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 66,940 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दरम्यान, चांदीचा भाव 87,800 रुपये प्रति किलो आहे. अमेरिकेतील व्याजदरात कपात करण्याबाबत यूएस फेडच्या अध्यक्षांनी केलेल्या भाष्यानंतर यूएस बाँडच्या उत्पन्नात घट झाली आहे, हे सोन्यासाठी चांगले लक्षण आहे.
असे आहेत पुण्यातील सोन्याचे दर…
पुण्यात सध्या 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 71,830 रुपये असून, मागील ट्रेडमध्ये ही किंमत मोठ्या फरकाने कमी झाली आहे. तर 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर 66,480 रुपये झाला आहे. तर चांदीचे दर प्रतिकिलो 87,200 रुपयांवर गेले आहेत.