उरुळी कांचन, (पुणे) : महाराष्ट्रातील जागृत देवस्थान श्री क्षेत्र भुलेश्वर येथे चौथ्या श्रावणी सोमवार निमित्त उरुळी कांचन (ता. हवेली) येथील हॅप्पी ग्रुपच्या वतीने दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी खिचडीचा प्रसाद वाटप करण्यात आला.
यावेळी हॅप्पी ग्रुपचे भाऊसाहेब चौधरी, दिलीप शितोळे, राहुल आप्पा काकडे, संदीप गायकवाड, महादेव कांचन, संजय चौधरी, निलेश जाधव, सागर निगडे, संकेत वाघ, राजाभाऊ म्हस्के, चंद्रकांत गिराम, सुहास पवार, गोरख कड, शुभम काळे, रवी पवार व हॅप्पी ग्रुपचे आदी सदस्य उपस्थित होते.
दरम्यान, हॅप्पी ग्रुपच्या वतीने नेहमीच सामाजिक उपक्रम राबविले जात असतात त्यामध्ये कोरोना काळात अन्नदान, हॉस्पिटल, औषधांची मदत असेल. सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदत असेल किंवा अनाथ मुलांना शालेय साहित्य वाटप असेल, ग्रुप मधील सदस्याच्या बहिणीच्या लग्नात मदत असेल किंवा ग्रुप मधील मृत सदस्य मित्राच्या मुलांच्या नावे आर्थिक मदत (FD)अशी अनेक सामाजिक कार्य नेहमीच ग्रुपच्या माध्यमातून सुरू असतात. अशा अनेक सामाजिक कार्यांमुळे हॅप्पी ग्रुपचे सर्वत्र कौतुक केल जात आहे.