राजगुरूनगर : खेड तालुक्यातील दावडे येथे १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला जीवे ठार मारण्याची धमकी देत जबरदस्ती करत विनयभंग केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दोन आरोपींवर विनयभंग व पोक्सो कायद्यांतर्गत खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऋतिक बाळासाहेब दौंडकर (वय-१९) व निखील दत्तात्रय दौंडकर (वय-१९) दोघे रा. दौंडकरवाडी, ता. खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित अल्पवयीन मुलीला २४ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास ऋतिक दौंडकर याने फोन करून तु माझ्या सोबत चल तु जर आली नाही तर तुला जिवे ठार मारेल अशी धमकी देऊन घराबाहेर बोलावुन घेतले. त्यानंतर मोटार सायकलवर बसवून दावडी परिसरातील फॉरेस्टच्या जागेत घेऊन गेला.
मुलीसोबत जबरदस्तीने शारिरिक सबंध प्रस्थापित करण्यासाठी तिचे कपडे बळजबरीने काढुन मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. निखील दौंडकर याने या सर्व प्रकाराला मदत केली. दरम्यान, मुलगी घरात नाही हे कुटुंबाला समजताच त्यांनी तिचा शोध सुरू केला.
पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घरापासुन काही अंतरावर माळावर गेले असता कुटुंबिय आल्याचे पाहुन ऋतिक दौंडकर व निखील दौंडकर यांनी पीडित मुलीला दुचाकीवरून सायकलवरून खाली ढकलुन दिले. यामध्ये पीडित मुलगी गंभीर जखमी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक स्नेहल गुरव करीत आहे.