मुंबई : बीसीसीआयने महिला T20 विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. महिला T20 विश्वचषक 3 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर दरम्यान खेळवला जाणार आहे. 15 खेळाडूंच्या संघात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. हरमनप्रीत कौर ही संघाची कर्णधार असणार आहे तर उपकर्णधार स्मृती मंधना हिच्याकडे असणार आहे.
सोमवारी ICC T20 World Cup 2024 चे नवीन वेळापत्रक जारी केले. ही स्पर्धा 4 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. महिला टी20 विश्वचषक 2024 चे यजमानपद बांग्लादेशाकडे होते. पण तेथे राजकीय हिंसाचार उफाळून आल्यामुळे आयसीसी ठिकाण बदलले. 20 ऑगस्टला आयसीसीने या स्पर्धेसाठी नवे ठिकाण जाहीर करत स्पर्धा युएईमध्ये होईल असे सांगितले. भारतीय संघ 4 ऑक्टोबरला न्युझीलंडविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.
टीम इंडियाचं वर्ल्ड कप वेळापत्रक…
-विरुद्ध न्यूझीलंड, 4 ऑक्टोबर, संध्याकाळी 7.30 वाजता, दुबई
-विरुद्ध पाकिस्तान, 6 ऑक्टोबर, दुपारी 3.30, दुबई
-विरुद्ध श्रीलंका, 9 ऑक्टोबर, संध्याकाळी 7.30 वाजता, दुबई
-विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 13 ऑक्टोबर, संध्याकाळी 7.30 वाजता, शारजाह
🚨 NEWS 🚨
Presenting #TeamIndia‘s squad for the ICC Women’s T20 World Cup 2024 🙌 #T20WorldCup pic.twitter.com/KetQXVsVLX
— BCCI Women (@BCCIWomen) August 27, 2024
टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेसाठी टीम इंडियाचा संघ :
हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृति मनधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रोड्रिग्स, ऋचा घोष (विकेटकीपर), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंह ठाकुर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील आणि सजना सजीवन.